मावळ तालुक्यात बऱ्यापैकी गावांत आता पिण्याच्या पाण्याची तसेच वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या दूर झाल्याचे चित्र दिसत आहे. मागील चार पाच वर्षांपासून मावळ तालुक्यातील गावागावांत विविध जलयोजना राबवल्या गेल्या, त्यामुळे पाण्याची समस्या पूर्वी सारखी राहिलेली दिसत नाही. तरीही सध्या तीव्र उन्हाळ्यात आणि मे अखेरीस काही गावांत अथवा ठिकाणी पाण्याची समस्या असेल तर आमदार सुनिल शेळके यांच्याशी थेट संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
केंद्र सरकारची जल जीवन मिशन योजना मावळ तालुक्यात अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली, अजूनही अनेक गावात कामं सुरु आहेत. मावळ तालुक्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्यांवर या योजनेमुळे पाणी पोहोचले. घरापर्यंत पाणी आल्याने महिला भगिनींची पायपीट थांबली आहे. आमदार सुनिल शेळके यांनी मागील चार वर्षांत यासाठी सातत्याने प्रयत्न केले. असे असले तरीही मावळमधील काही ठिकाणी काही गावात, वाडीवस्त्यांवर अद्याप जलगंगा पोहोचली दिसत नाही.
यामागची कारणे अनेक आहेत, परंतू डोंगर भागात उन्हाळ्यात पाण्याची समस्या अधिक गहन होते. तसेच धरण उशाला कोरड घशाला अशा अवस्थेत आजही अनेक गावे आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या कालावधीत पाण्याची समस्या गंभीर होऊन जर तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर, त्याबाबत आमदारांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( MLA Sunil Shelke appeal to inform if there is water problem phone number 9890099009 )
‘मावळ तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व महिला-भगिनींना आवाहन करतो की,आपल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल किंवा जल जीवन मिशन योजनेबाबत काही तक्रार असेल तर फोनद्वारे माझ्यासोबत संपर्क साधून माहिती द्यावी.’ असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे. 9890099009 मोबाईल क्रमांक त्यासाठी देण्यात आला आहे.
#मावळ तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व महिला-भगिनींना आवाहन करतो की,आपल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल किंवा जल जीवन मिशन योजनेबाबत काही तक्रार असेल तर फोनद्वारे माझ्यासोबत संपर्क साधून माहिती द्यावी.
– आपला सुनिल शंकरराव शेळके pic.twitter.com/QcqOWqKvah— Sunil Shelke (@shelkesunilanna) May 16, 2024
अधिक वाचा –
– यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News
– संजोग वाघेरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ! बारणेंना फक्त ‘इथेच’ लीड मिळेल, पण आपला विजय ‘इतक्या’ लीडने होणार
– गुडन्यूज ! मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ महिन्यात पूर्ण होणार मिसिंग लिंक प्रकल्प