Dainik Maval News : मावळ पंचायत समितीच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागांची आढावा बैठक आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि.11 रोजी वडगाव मावळ येथे संपन्न झाली. ‘नागरिकांशी थेट संबंध असणारा महसुल विभाग आहे. त्यामुळे या विभागातील कामात सुसुत्रता आणण्याची गरज आहे. या विभागाची बहुतांशी कामे जमिनीशी आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्यामुळे शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांपर्यंत आणि ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रत्येक व्यक्तीचा महसुल विभागाचा नियमितपणे संबंध येतो.’
त्यादृष्टीने कार्यालयांमध्ये उपाययोजना कराव्यात. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे. आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येकापर्यंत रेटिंगचा लाभ मिळाला पाहिजे. संजय गांधी निराधार योजनेतील कामांना गती देण्यासाठी सर्व स्तरावर समन्वय ठेवावा. नागरिकांना वारंवार कार्यालयात यावे लागू नये यासाठी प्रक्रियेत सुलभता आणावी, असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.
महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत तालुक्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी, तसेच प्रत्येक लाभार्थ्याला योजनांचा योग्य लाभ घेता यावा, यासाठी नाविन्यपूर्ण विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबवावेत. मंडलाधिकारी व तलाठी कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारती बांधण्यात येत आहेत, जी कामे अंतिम टप्प्यात आहेत ती लवकर पूर्ण करावीत व संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन कार्यालयात नागरिकांच्या सेवेसाठी वेळेवर उपस्थित राहून कामे मार्गी लावावीत, अशाही सूचना शेळकेंनी दिल्या.
नागरिकांकडून तक्रारी येऊ नयेत यासाठी मुख्य कार्यालयांमध्ये मदत कक्ष किंवा हेल्पलाइन यांसारख्या यंत्रणा स्थापन करून नागरिकांना मार्गदर्शन करता येईल. तसेच नागरिकांची कामे विहित कालावधीत पूर्ण होतील, याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावे, अशा सुचना महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीला आमदार सुनील शेळके यांसह तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, अभिषेक पिसाळ, अमोल दिवटे तसेच सर्व मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा ; विभागनिहाय आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
– आंदर मावळ विभागातील नागरिकांना मोठा दिलासा ! वडेश्वर येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक