Dainik Maval News : मावळ विधानसभा क्षेत्रातील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आमदार सुनील शेळके यांची संयुक्त बैठक पंचायत समिती सभागृहात बुधवारी (दि.11) संपन्न झाली. या बैठकीत आमदार शेळकेंनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या देखील समस्या व सुचना जाणून घेतल्या. तसेच तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध उपाययोजना कशा करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
काही पोलीस स्टेशनच्या स्वतंत्र इमारतीसाठी जागा उपलब्ध व्हावी, अतिरिक्त मनुष्यबळ मिळावे असे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी पाठवावेत, त्याचा पाठपुरावा गृह विभागाकडे करण्यात येईल. तसेच कामशेत, देहूरोड,सोमाटणे, लोणावळा येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाहेरुन नागरिक येत असतात. नागरिक घराबाहेर पडत असल्याने पोलीस यंत्रणेला देखील सतर्क रहावे लागते. स्थानिक हॉटेल्स व छोटे व्यावसायिक पर्यटकांवर अवलंबून असल्याने त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आमदारांनी सांगितले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई व्हावी. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत स्थानिक व्यावसायिक, नागरिक, पर्यटक यांना दक्षता घेण्याचे आवाहन करावे, अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच नवीन वर्षाच्या स्वागत प्रसंगी नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करताना कायद्याचे पालन करावे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दक्षता घ्यावी, असे आवाहन पर्यटकांना केले.
या बैठकीस आमदार सुनील शेळकेंसह लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप, तळेगाव दाभाडे शहर पोलीस स्टेशनचे प्रदीप रायण्णावर, एमआयडीसी स्टेशनचे रणजीत जाधव, देहुरोड पोलीस स्टेशनचे विजय वाघमारे, वडगाव पोलीस स्टेशनचे कुमार कदम, कामशेत पोलीस स्टेशनचे रवींद्र पाटील, शिरगाव पोलीस स्टेशनच्या तेजस्विनी कदम व इतर अधिकारी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News