आमदार सुनिल शेळके यांनी मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची शुक्रवारी (दि. 14) सदिच्छा भेट घेतली. याभेटीत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी सन 1972 ते 1976 या काळात लोणावळा येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि वडेश्वर येथील आदिवासी आश्रमशाळा इमारत या महत्त्वपूर्ण कामांच्या मान्यता घेऊन उभारणी केल्याचे पुरावे पाहायला मिळाले, असे आमदार शेळकेंनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तसेच विधीमंडळात नेतृत्व करत असताना कृष्णराव भेगडे यांनी विधानसभा क्षेत्रातील वेगवेगळ्या मुद्यांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांची माहिती मिळाली. यामध्ये प्रामुख्याने पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केलेल्या पाठपुराव्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मावळ तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात होत असलेल्या विकासकामांचे आणि निर्णयांचे कृष्णराव भेगडे यांनी तोंडभरून कौतुक केल्याचे मला समाधान आहे, असे शेळके यांनी सांगितले. ( MLA Sunil Shelke Met to former MLA Krishnarao Bhegde Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– धक्कादायक ! लोणावळा शहरात सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक
– पावसाळा सुरू झाला तरीही कार्ला-मळवली पुलाचे काम अपूर्णच ! संतप्त ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन
– घरावर सोलर पॅनल बसवण्याचा विचार करताय? मग ही बातमी नक्की वाचा, सरकारी सबसिडी आणि योजनांची माहिती एका क्लिकवर