Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी “जनसंवाद दौरा” या अभियानाची सुरूवात केली आहे. या अभियानाअंतर्गत सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) रोजी आमदार शेळके यांनी राजपुरी, भोयरे आणि पाथरगाव येथील गावांना भेट दिली.
याप्रसंगी राजपुरी, भोयरे आणि पाथरगाव या गावांतील नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक त्रासदायक अडचणी मोकळेपणाने आमदार सुनील शेळके यांच्या समोर मांडल्या. त्यात प्रामुख्याने वेळेवर पाणी मिळत नाही, रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, वीजेचा अभाव, वाहतूक सेवेचा अभाव अशा अनेक समस्या गावकऱ्यांनी स्पष्टपणे मांडल्या.
वरील सर्व मुद्द्यांवर आमदार शेळके यांनी संबंधित विभागांशी तात्काळ समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी खात्री ग्रामस्थांना दिली. तसेच दौऱ्यात उपस्थित महसूल, पंचायत समिती, जलसंपदा, विद्युत वितरण, सार्वजनिक बांधकाम आणि वनविभाग यांचे प्रमुख अधिकारी यांना तशा सूचना दिल्या.
सर्व तक्रारींची सखोल नोंद घेऊन संबंधित विभागांशी तातडीने चर्चा करून त्वरित कार्यवाही केली जाईल, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी ग्रामस्थांना दिला. मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून सुनील शेळके यांचे हे अभियान ही केवळ एक राजकीय उपक्रम नसून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा आणि विकासाच्या वाटचालीला गती देण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
