तळेगाव दाभाडे : औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करत आमदार सुनिल शेळके यांनी आक्रमक पवित्रा घेतला. याआधी अनेकदा त्यांनी कामगारांची बाजू भक्कमपणे मांडत विविध स्तरावर प्रश्न मांडले होते. आमदार शेळके यांनी (मंगळवार, दि. 25 जुलै) औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत विधानसभेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. ( MLA Sunil Shelke Raised Problems Of General Motors Company Workers In Maharashtra Monsoon Session )
आमदार शेळके म्हणाले की, “माझ्या मावळ मतदार संघातील तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स या कंपनीतील कामगार मागील अडीच वर्षांपासून न्याय व हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत. नव्याने जी कंपनी तेथे येणार आहे, त्यात त्यांना रुजू करून घेण्यात यावं. यासाठी सातत्याने मागणी करत आहेत. राज्य सरकार, मा.न्यायालय अशा ठिकाणी लढा देत आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने काही निर्णय दिले ते कंपनीच्या बाजूने दिले. अशी भावना निर्माण होऊन ती कामगारांनी माझ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.”
आमदार शेळके पुढे म्हणाले की, “जवळपास 1600 हून अधिक कामगार कंपनीत काम करतात. राज्यभरातून आलेले अडीच हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करतात. कंपनीकडून आता सांगितले जात आहे की, आपल्याला 110 दिवसांचे व्हीआरएस पॅकेज देणार आहोत. त्यासाठी 27 जुलैपर्यंत आपण कंपनीत यावं. ॲग्रीमेंटवर सही करावी आणि आपण कंपनीतून बाहेर पडावं आणि जर तुम्ही 25 जुलै पर्यंत आला नाही तर आम्ही तुम्हाला पुढचे पॅकेज देणार नाही. अशी तंबीही कंपनीकडून कामगारांना देण्यात आली आहे.”
हेही वाचा – अधिवेशनात घुमला मावळचा आव्वाज..! तालुक्यातील विविध प्रश्नांकडे आमदार शेळकेंनी वेधले सभागृहाचे लक्ष
आमदार शेळके म्हणाले, “माझी मंत्रिमहोदयांना विनंती आहे की, आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. याचा अर्थ सरकारने जो निर्णय घेईल त्याचे आम्ही समर्थन करु, असे आम्हांला गृहीत धरु नका. पुढील आठवड्यात हे सर्व कर्मचारी आपल्या परिवाराला घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरणार आहोत. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली. ( MLA Sunil Shelke Raised Problems Of General Motors Company Workers In Maharashtra Monsoon Session )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मणिपूर महिला अत्याचार घटनेवर मावळ तालुक्यात काँग्रेस आक्रमक, थेट तहसील कार्यालयावर काढला मोर्चा आणि…
– एकाच महिन्यात रस्त्यांची चाळण, लोणावळ्यात मनसे आणि भाजपचा मोर्चा, आंदोलनासाठी निवडली हटके स्टाईल