Dainik Maval News : मावळ पंचायत समिती अंतर्गत असणार्या पाणी पुरवठा विभाग, बांधकाम,आरोग्य,शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, एकात्मिक बालविकास विभाग इ. विभागातील कामांचा आमदार सुनील शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून बुधवारी (दि. 11) आढावा घेतला.
काही गावातील अंगणवाडी, शाळेच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्या कामांची सविस्तर माहिती द्यावी. शासकीय निधी व्यतिरिक्त सामाजिक संस्था, कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून काही कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करु.
जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांमधील अडचणी यावेळी अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून जाणून घेतल्या. ज्या गावातील कामांना ठेकेदारांकडून विलंब होत आहे त्या ठेकेदारांकडे अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करुन कामे पूर्ण करावीत. ज्या गावांमध्ये अधिक क्षमतेची पाण्याची टाकी, वितरण लाईन टाकायची असल्यास अंदाजपत्रक तयार करावे व लवकरात लवकर सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशा सुचना आमदार शेळके यांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
घरकुलासाठी ग्रामीण भागातील ज्या नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करावे.घरकुलाचा लाभ मिळण्यापासून पात्र लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी.
ज्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे, त्या कामांना प्राधान्याने गती द्यावी. ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीनुसार नवीन सुचविलेल्या कामांना देखील अधिक निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. फक्त कागदोपत्री कामांचा पाठपुरावा न करता प्रत्यक्ष कृतीतून कामे पुर्ण करावीत, शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. आजच्या बैठकीतील सुचनांची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी,अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हिवाळी अधिवेशनानंतर सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांकडून समस्या जाणून घेणार आहोत व कामे मार्गी लावण्याबाबत चर्चा करणार आहोत.
या बैठकीला आमदार सुनिल शेळके यांसह गटविकास अधिकारी के.के. प्रधान, जेष्ठ नेते गणेश ढोरे, मा सभापती विठ्ठलराव शिंदे, मा पं. सदस्य साहेबराव कारके, संजय बाविस्कर, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.डी. थोरात, गटशिक्षण अधिकारी सुहास वाळुंज, सर्व विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक व ठेकेदार उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा ; विभागनिहाय आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
– आंदर मावळ विभागातील नागरिकांना मोठा दिलासा ! वडेश्वर येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक