महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, 27 जून ते शुक्रवार, 12 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. ( Monsoon Session of Maharashtra State Legislature in Mumbai from 27th June )
पावसाळी अधिवेशन दिनांक 27 जून ते शुक्रवार, 12 जुलै 2024 या कालावधीत होणार असून, एकूण 13 दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार 29 जून 2024 सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
अधिक वाचा –
– वडगाव येथे मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त आढावा बैठक संपन्न
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची सदिच्छा भेट । MLA Sunil Shelke
– ‘जयंत पाटील साहेब… आम्हाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा’, आमदार सुनिल शेळकेंचे जयंत पाटलांबाबत मोठे विधान । Sunil Shelke & Jayant Patil