Dainik Maval News : महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे, देहू आणि पंढरपूर रेल्वेमार्गावर थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांनी केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सेवेबाबतच्या मागण्या मार्गी लावण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे.
देहू – पंढरपूर रेल्वे बाबत खासदार मोहिते-पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली असून त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यामुळे महाराष्ट्रभरातील लाखो वारकरी भक्तांसाठी पंढरपूर-देहू रेल्वे सुविधायुक्त ठरेल असेही मोहिते-पाटील यांनी सांगितले आहे. ( MP Dhairyasheel Mohite Patil Demand to Railway Minister Ashwini Vaishnav to start Dehu to Pandharpur Railway )
- पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच देहू येथील संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, तसेच आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी राज्यभरातील लाखो भक्तांचे प्रमुख तीर्थस्थळे आहेत. सध्याच्या परिस्थितीत देहू व पंढरपूर दरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे वारकरी भाविक भक्तांसह सामान्य प्रवाशांना अडचणी येत आहेत.
खासदार मोहिते-पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाकडे त्वरित ही रेल्वे सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. यासोबतच दादर-पंढरपूर सांगोला-मिरजमार्गे सातारा ही एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालते प्रवाशांच्या सोईकरता ही रेल्वे दररोज नियमित करण्यात यावी. कुर्डुवाडी जंक्शनवर पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला थांब्याची मागणी केली आहे. तर हुतात्मा व उद्यान एक्सप्रेसला माढा व जेऊर येथे थांबा देण्याची मागणी केली.
अन्य मागण्या –
मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस ही कोरोना काळानंतर संपूर्णपणे एसी कोचमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. सध्या या गाडीत 2 स्लीपर कोच आणि 2 जनरल कोच उपलब्ध आहेत. मुंबई ते हैदराबाद दरम्यानच्या अन्य स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना कोचच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, या गाडीमध्ये अतिरिक्त 2 स्लीपर आणि 2 जनरल कोच जोडण्यात यावे म्हणून सांगतिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News