राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ( National Leader to National Father Seva ) सेवा पंधरवडा निमित्ताने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Minister Chandrakant Patil ) यांच्या हस्ते कोथरूड ( Kothrud ) येथे विविध प्रकराच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मंत्री पाटील यांच्या निर्देशानुसार हवेली तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कोथरूड येथे विविध दाखले जागेवर उपलब्ध करून देण्याची सुविधा ( Free Certificates Distribution ) करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या माध्यामातून विविध प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे शुभारंभ प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा – राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाचा वडगावमध्ये प्रारंभ, रुग्णांना फळे वाटून अभियानाचा शुभारंभ
नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेखही पाटील यांनी केला. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा' या अंतर्गत कोथरूड मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मोफत उपलब्ध करून दिले आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ केला असून त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना सतरंजीचेही वाटप केले. #HappyBdayModiji pic.twitter.com/FkEDqOdAVN
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) September 17, 2022
पंधरवड्याच्या शुभारंभ प्रसंगी 52 नागरिकांना उत्पन्नाचे दाखले, 18 रहिवास प्रमाणपत्र, 22 डोमेसाईल प्रमाणपत्र, 12 प्रतिज्ञापत्र आणि 21 सातबारा असे 125 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ( Minister Chandrakant Patil Inauguration Free Certificates Distribution Kothrud )
अधिक वाचा –
महत्वाची बातमी! चांदणी चौकातील जुना पुल पाडणार, आजपासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या
Video : लोणावळ्यात ब्लेडने बॅग फाडून दीड लाख लंपास, 2 महिलांची हातचलाखी CCTV कॅमेरात कैद