Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कार्ला गावच्या विद्यमान सरपंच दिपाली हुलावळे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिट्यूट या केंद्र शासनाच्या संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला.
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री विजय राज, मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद, वाईचे खासदार नितीन पाटील उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी सरपंच दिपाली हुलावळे यांचे अभिनंदन केले. तसेच मावळ तालुक्यातील सरपंच परिषदेच्या सर्व सरपंच व कार्ला ग्रामस्थांनी हुलावळे यांचे अभिनंदन केले आहे.
कार्ला गावात झालेल्या विकासकामांमुळे गावाला तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गावच्या प्रगतीत सरपंच दिपाली हुलावळे यांनी मोठे योगदान दिल्याने त्यांच्या कार्याची दखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिट्यूटने घेऊन त्यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर केला होता.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार ! कुरवंडे येथील 42 शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप । Maval News
– अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, पिंपळोली गावच्या हद्दीतील घटना । Maval News
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
– कुसवलीतील सहारा वृद्धाश्रमात रंगली अनुभवाच्या कवितांची व मुक्त संवादाची मैफल । Maval News