Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराजवळील माळवाडी (ता. मावळ) गावच्या सरपंच पल्लवी संपत दाभाडे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद, पर्यावरणमंत्री विजय राज, वाईचे खासदार नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पल्लवी दाभाडे या सहकार महर्षी ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांच्या त्या सूनबाई आहेत. सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दाभाडे यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. तसेच महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिर घेतले.
गावपातळीवर राबविलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सर्व सुविधायुक्त इमारत, अंगणवाडी शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, गावातील मंदिरे, विहीर – तलाव स्वच्छता, पाणीपुरवठा योजना, सुसज्ज दशक्रीया घाट, गावातील अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटार योजना आदी केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार मिळाला असल्याचे सरपंच पल्लवी दाभाडे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी ; आरपीआयचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन
– परभणी घटनेच्या निषेधार्थ पवनानगर बंद ! आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी । Pavananagar
– बनावट घड्याळ विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल, देहूरोड येथील घटना । Maval Crime