Dainik Maval News : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. इच्छुक तिकीट मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गज नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच लोणावळ्यातील एका महिला उमेद्वाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने एक सकारात्मक निर्णय घेतल्याचे पहायला मिळाले आहे. चक्का एका पेरू विक्रेत्या महिलेला थेट निवडणूकीचे तिकीट पक्षाकडून मिळाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या महिलेला तिकीट दिले आहे.
फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलंय. त्यांच्या उमेदवारीची राज्यभर चर्चा होत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुरा ही सांभाळावी लागतीये. त्यामुळं भाग्यश्री दिवसा फळ विक्री करता-करता ही प्रचार करत आहेत.
खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासींच्या पट्ट्यात भाग्यश्री जगताप यांचे जंगी स्वागत होत असून पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते अन त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेविका होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
