Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळ या निवडणुका होत आहेत. स्व. अजितदादा पवार आणि स्व. रुपलेखाताई ढोरे यांच्या दुःखद निधनानंतर सर्वच पक्षातील उमेदवारांकडून संयमाने प्रचार केला जात आहे. अशात इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांच्याकडून सध्या होम-टू-होम प्रचार केला जात आहे.
शनिवारी (दि. १) पल्लवी दाभाडे यांनी इंदुरी-वराळे गटातील नवलाख उंबरे गावात प्रचार केला. गावातील प्रत्येक घरापर्यंत जात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला. स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी, आमदार सुनील शेळके यांच्या विकासाचे धोरण राबविण्यासाठी निवडणुकीत घड्याळासमोरील चिन्ह दाबून आपणास विजयी करण्याचे आणि जनसेवेची संधी देण्याचे आवाहन यावेळी पल्लवी दाभाडे यांनी मतदारांना केले.
इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड मानले जात आहे. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि मावळच्या विकासात हातभार लावण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचे शिलेदार म्हणून पल्लवी दाभाडे यांना निवडणुकीत विजयी करण्याचा निर्धार आता मतदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या गटात पल्लवी दाभाडे यांचा विजय सहजरित्या होईल, अशी चर्चा सध्या मतदारांमध्ये रंगली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो
