Dainik Maval News : राज्याचे मा. उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या अकाली निधनानंतर मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्यभर शोक व्यक्त केला जात आहे. मावळ तालुक्यात स्व. अजित दादांच्या रक्षा कलश दर्शन यात्रेच्या माध्यमातून ज्या नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता आले नाही, त्यांना अजितदादांचे अंतिम दर्शन घेता आले. यासोबतच स्व. अजितदादा पवार यांनी मावळ तालुक्याला दिलेला हजारो कोटींचा निधी आणि त्यातून झालेली विकासकामे लक्षात घेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतरूपी आशीर्वाद देत स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची भावना मतदार व्यक्त करीत आहेत.
मावळात सध्या सर्वत्र शोकभावना असून त्याचबरोबर स्व. अजितदादांच्या कार्याची कृतज्ञ आठवण आणि श्रद्धांजली व्यक्त करण्याची भावना अधिक तीव्र झाली आहे. मावळच्या विकासासाठी स्व. अजित दादांनी दिलेले योगदान, मावळचा कायापालट घडविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि विकासाला दिलेली दिशा, त्याच जोडीला आमदार सुनील शेळके यांनी विकासकामांच्या लावलेला धडाका या सगळ्याची आठवण ठेवून मावळमधील सामान्य नागरिक मतदार बंधू भगिनी ही स्पष्ट भूमिका घेताला दिसत आहेत.
मावळच्या विकासासाठी “काम, निधी आणि निर्णय” या तीन आधारांवर स्व. अजितदादांनी जे उभं केलं, ते पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील मावळ घडवण्यासाठी मावळकरांनी आता “आपली बारी” मानली आहे. त्यामुळे अजित दादांना श्रद्धांजली म्हणून, मावळमधील विविध गावांतील नागरिक, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयामागे राजकारण नाही, तर मावळच्या विकासाचा पुढचा टप्पा पूर्ण करण्याची जबाबदारी आणि अजित दादांच्या कार्याला खरी श्रद्धांजली देण्याची भावना आहे. विकासाचे काम थांबू नये, योजना आणि निधीच्या दृष्टीने मावळचा वेग कायम राहावा, आणि मावळचा परिवर्तनाचा प्रवास अधिक मजबूत व्हावा,यासाठी एकत्र येण्याची गरज मावळमधील नागरिक व्यक्त करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो
