राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत, भारतीय जनता युवा मोर्चा लोणावळा मंडल यांच्यातर्फे रविवारी शहरात आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य निंदनीय असून छत्रपती शिवराय यांचा अवमान करणारे असे असल्याचा आक्षेप भाजपाकडून घेण्यात आला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ( NCP MLA Jitendra Awad Controversial Statement on Chhatrapati Shivaji Maharaj Agitation By BJP Yuva Morcha In Lonavla City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भाजयुमो शहराध्यक्ष शुभम मानकामे, उपाध्यक्ष श्रवण चिकणे, गटनेते देविदास कडू, राजाभाऊ खळदकर, राजूभाऊ दळवी, ललितजी सिसोदिया, अरूण लाड, हर्षल होगले, अभय पारख, नंदू जोशी, रूपेश नांदवटे, बाबू संपत, प्रफुल्ल काकडे, दिनेश ओसवाल आणि युवा मोर्चाचे चिराग शर्मा, रिशिकेश इंगुळकर, आयुष कांकरिया, आकाश घोणे आणि पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज! आता लोणावळ्यासाठी शिवाजीनगरहून 4 लोकल सुटणार, पाहा वेळापत्रक
– ‘दादा हो… आता तरी दिवे लावा’, वडगाव शहर भाजपाची नगरपंचायतला विनवणी, निवेदनातून वडगावकरांचा अंत न पाहण्याचा सल्ला