‘दहा वर्षे खासदार निवडून दिला. त्या श्रीरंगाचे आपण रंग पहिले आहेत. एकदा निवडून आले की, ते परत तोंड दाखवायला सुद्धा येत नाहीत. त्यामुळे हे असे रंग दाखवणारे खासदार पुन्हा नको, हा निश्चय मावळ लोकसभेतील मतदारांनी केला आहे,’ अशी सडेतोड टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केली आहे. तसेच दुसरीकडे आपले उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कोणतीही जबाबदारी मिळाल्यानंतर प्रशंसनीय काम करून दाखवलेले आहे. याची खात्री मतदारांना पटली असून त्यांचा विजय पक्का असल्याचे ते यावेळी म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभेचे महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना समाजाच्या सर्वच स्तरांतून भरघोस पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रचारार्थ पनवेल येथील खांदा वसाहत येथील आगरी शिक्षण संस्थेच्या सभागृहात शुक्रवार (दि. 3 मे) रोजी असंघटित कामगारांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी मेहबूब शेख बोलत होते. ( NCP Sharad Pawar group leader Mehboob Sheikh criticized Maval Lok Sabha Shiv sena candidate Shrirang Barne )
मेहबूब शेख पुढे म्हणाले की, निवडणुकीत आपल्याला संविधान वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे. कारण भाजपा जर पुन्हा निवडून आली तर आगामी भविष्यात देशात निवडणुका होणार नाहीत. मी स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो की, माझा जन्म या मातीत आणि सर्व धर्म समभाव मानणाऱ्या देशामध्ये झाला आहे. आपल्या देशात हिंदू बांधव भगवत गीतेप्रमाणे चालतात, मुसलमान बांधव कुराणा प्रमाणे चालतात, ख्रिस्ती बांधव बायबल प्रमाणे चालतात. परंतु भारतीय म्हणून आपण सगळे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. आणि हेच संविधान बदलण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे.
अधिक वाचा –
– रक्तदान शिबिरापासून ते वधू-वरांसाठी लकी ड्रॉ, वडगावात अगदी थाटामाटात पार पडला सामुदायिक विवाहसोहळा । Maval News
– कान्हे गावातील धक्कादायक प्रकार ! प्रसिद्ध गाडा मालकाच्या गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला । Maval News
– दहिवली-कार्ला येथील सामुदायिक विवाहसोहळ्यात 5 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद