Dainik Maval News : नवोदय विद्यालय निवडीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मुळशी तालुक्यातील कासारसाई शाळेतील विद्यार्थी नीरज कुंभार याची निवड झाली आहे. संपूर्ण मुळशी तालुक्यातून नवोदय करिता निवडण्यात आलेला नीरज हा एकमेव विद्यार्थी असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. तसेच नीरजच्या या उज्वल यशाबद्दल संपूर्ण शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांकडून स्वातंत्र्यदिनी त्याचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारसाई ( ता. मुळशी ) येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी नीरज तुषार कुंभार याची नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप, पुणे येथे 92.50 टक्के गुण मिळवून निवड झाली आहे. ही निवड झालेली नीरज हा मुळशी तालुक्यातील एकमेव विद्यार्थी आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा 2025 फेब्रुवारी महिन्यात पार पडली होती. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये त्याने 300 पैकी 272 मार्क मिळवून उज्वल यश संपादन केले आहे.
स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार :
शुक्रवारी (दि. १५ ऑगस्ट ) रोजी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात कासारसाई शाळेत शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांकडून नवोदय परीक्षेत यश मिळविल्याबद्दल नीरज कुंभार याचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल व नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल नीरज याला वर्गशिक्षिका काचळे मॅडम यांनी सायकल भेट म्हणून दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती । Pawana Dam News
– वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
– पुणे – लोणावळा लोकल : कोरोना काळात बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा सुरू करावी