Dainik Maval News : पवन मावळ वारकरी समाज मंडळाच्या मावळत्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीचा कार्यकाळ सन २०२५ ते २०३० असा असणार आहे. रविवारी (दि.२) झालेल्या वार्षित सभेत ही कार्यकारिणी जाहीर जाहीर करण्यात आली. यात मंडळाच्या अध्यक्षपदी हभप प्रवीण सोपान मुऱ्हे, तर सचिवपदी हभप गणेश वाळुंजकर यांची निवड करण्यात आली आहे.
पवन मावळ वारकरी समाज नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे ;
अध्यक्ष – हभप प्रविण सोपान मुऱ्हे
सचिव – हभप गणेश वांळुजकर
कार्याध्यक्ष – हभप मकंरद ढम
उपाध्यक्ष – हभप विठोबा काळे
सहसचिव – हभप नाथा आडकर
विश्वस्त – हभप किसन बिडकर, हभप संतोष कडू, हभप शिवाजी शेंडगे, हभप विष्णू महाराज तोंडे, हभप अशोक कारके, हभप देवेंद्र घोटकुले, हभप तुकाराम काकडे, हभप संजय महाराज कालेकर
कार्यकारिणी निवडीनंतर मावळत्या विश्वस्त मंडळाचा निरोप समारंभ करण्यात आला. तसेच नवीन विश्वस्त मंडळाचा सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी पवनमावळ विभागातील वारकरी संप्रदायातील अनेक प्रवचनकार, वारकरी उपस्थितीत होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक