Dainik Maval News : रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण यांचे पथकामार्फत खालापूर तालुक्यात बुधवारी (दि. 14) आपत्ती व्यवस्थापन विषयाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सरनौबत नेताजी पालकर सभागृह येथे आयोजित केले होते.
या शिबिराचे उद्घाटन खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांचे हस्ते झाले. प्रास्ताविक नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी केले. नागरी संरक्षण दल उरणचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाट यांनी शिबिरार्थींना युद्धजन्य परिस्थितीत कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात याबाबतीत तंत्रशुद्ध मार्गदर्शन करताना दृकश्राव्य प्रणालीचा वापर केला.
आपत्तीचे विविध प्रकार विस्तृतपणे समजावून सांगताना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. प्रथमोपचार आणि कोणत्या प्रसंगी कसे मदतकार्य करायचे याबाबतीत प्रशिक्षणार्थींना सहभागी करून मार्गदर्शन केले.
कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी मनाच्या तयारी सोबत तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे आवश्यक असल्याने अशा शिबिराचे आयोजन केल्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी या शिबिरानंतर शिबिरार्थींची सामाजिक जबाबदारी वाढली असल्याची जाणीव करून दिली.
खालापूर तालुक्यातील महसूल कर्मचारी, खोपोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेडचे सदस्य, तालुक्यातील पोलीस पाटील, आपदा मित्र आणि सखी, हेल्प फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. विविध संसाधनांचे प्रदर्शन आणि वापर याबद्दल मार्गदर्शन केले गेले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई