Dainik Maval News : कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत बुधवारी (दि.2) रोजी झालेल्या ट्रेलर अपघातात एकाचा होरपळू मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी (दि.2) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कामशेत गावाच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे हायवे वर कामशेत खिंडीतील उताराजवळ हा अपघात घडला. याप्रकरणी अँब्युलन्स चालक अभिनंदन सिताराम अडसुळ (वय 33 रा. कामशेत) यांनी फिर्याद दिली आहे.
अभिषेक राम कांबळे (वय 18 वर्षे रा. मोगरा ता. माजलगाव जि.बीड) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, आकाश श्रीधर कटके (वय 25 वर्षे रा. नाणे ता. मावळ) प्रविण बांगर (रा. कान्हे ता. मावळ) विलास बालाजी रायराव (वय 27 वर्षे, रा. करम ता. सोनपेठ जि.परभणी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अँम्ब्युलन्स चालक हा कर्तव्यावर असताना त्याला कामशेत खिंडीत अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तिथे ट्रेलर (गाडी नंबर MH46 CL 7041) पलटी झाल्याचे आणि केबिनला आग लागल्याचे दिसून आले. त्यांमी आणि पोलीस व जमलेल्या नागरिकांच्या मदतीने चालकाला बाहेर काढले. परंतु चालकासोबत असलेल्या अभिषेक राम कांबळे (वय 18 वर्षे रा. मोगरा ता. माजलगाव जि.बीड) याला आगीता भडका उडाल्याने केबीनच्या बाहेर काढता आले नाही.
त्यानंतर अग्नीशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. परंतु आगीत होरपळून अभिषेक कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये दुचाकी चालक (MH14 HZ 3074) आकाश श्रीधर कटके व प्रविण बांगर, विलास बालाजी रायराव हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस हवालदार तावरे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक गावात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा ! बैलाच्या कपाळावरील नारळ तोडण्यासाठी तरूणाईत स्पर्धा । Bail Pola 2024
– वंदन दुर्गांना । “योगसाधनेतून घडली आंतरराष्ट्रीय योगप्रशिक्षक” : मनाली देव यांचा प्रेरणादायी ‘जीवनयोग’ । International Yoga Instructor Manali Dev
– कार्ला गडावरील एकविरादेवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ; अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी विकासकामांचे भूमिपूजन । Karla News