Dainik Maval News : किरकोळ वादातून एकाला बेदम मारहाण करीत त्याची हत्या केल्याचा गंभीर प्रकार पारवडी (ता. मावळ) येथे घडला आहे. बुधवारी (दि.5) ही घटना घडली. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
बुधवारी (दि.5) मौजे पारवडी (ता. मावळ) गावच्या हद्दीत ही हत्या करण्यात आली. सागर बाळू रोकडे (वय 52, रा. पारवडी ता. मावळ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृत युवकाचे नातेवाईक संदिप देवराम रोकडे (वय 43, सध्या रा. खंडाळा ता. मावळ, मुळ रा. पारवडी ता. मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- त्यानुसार पोलिसांनी सोन्या उर्फ सुनिल रूषिनाथ काटकर आणि संकेत रूषिनाथ काटकर (दोघेही रा. पारवडी ता. मावळ) यांच्या विरूद्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर, कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियन 2023 च्या कलम 103 (1), 3 (5) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम सन 1989 च्या कलम 3 (2) (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी सोन्या उर्फ सुनिल रूषिनाथ काटकर यास अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी, संकेत रूषिनाथ काटकर याचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.) रोजी सकाळी अकरा ते रात्री साडेदहाच्या दरम्यान पारवडी गावच्या हद्दीत आरोपी सोन्या उर्फ सुनिल रूषिनाथ काटकर आणि संकेत रूषिनाथ काटकर यांनी फिर्यादीचे भाऊ सागर बाळू रोकडे यास बुधवारी (दि.5) पहाटे पद्मावती मंदिराजवळ झालेल्या भांडणाचा राग मनात धरून व इतर अज्ञात कारणातून लाथाबुक्क्याने व काठीने मारहाण करून जीवे ठार मारले. यानंतर त्याचा मृतदेह एका वाहनातून त्याच्या राहत्या घरात आणून ठेवला, अशी फिर्याद दाखल आहे.
प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक हे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर