Daink Maval News : आयुध निर्मिती देहू रोड (O.F.D.R) फॅक्टरीचे निगमीकरण करण्याचा तसेच भविष्यात होणाऱ्या कामगारांच्या हस्तांतरण च्या Option Form चा विरोध करण्यासाठी आणि सेवानिवृत्तीपर्यंत सरकारी नोकर म्हणून अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सर्व संघटना आणि असोसिएशन मिळून संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली आहे.
मान्यता प्राप्त संघ आणि संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि अधिकाऱ्यांनच्या असोसिएशन (CDRA) यांच्याद्वारे दिलेल्या माहितीनुसार OFDR शाखेत OFWU (AIDEF), OFKU (INDWF), BSKS (BPMS), OFEU (NPDEF) यांसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
संयुक्त कृती समितीने ओ.एफ.डी.आर कर्मचाऱ्यांच्या एकतेसाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व्यापक पातळीवर जनजागृती उपक्रम सुरू केले आहेत. 9 सप्टेंबर रोजी पॅम्प्लेट्स वितरित करण्यात आले तर 10 सप्टेंबरला बैठक घेण्यात आली, ज्याला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आंदोलनाच्या समर्थनार्थ खालील कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली आहे :
11 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2025 दरम्यान हस्ताक्षर अभियान.
1 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निगमीकरण विरोधी दिवस’ करने.
याशिवाय, प्रसार भारतीय मॉडेल लागू करण्याच्या मागणीसाठी पुढील काळात एकदिवसीय संप आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचे समितीकडून इशारा देण्यात आला आहे. संयुक्त कृती समितीने सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमांत सक्रीय सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित
