व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 31, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर

शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता माहे जुलैअखेर जिल्हानिहाय लोकअदालतीचे आयोजन करावे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

Revenue Minister Chandrashekhar Bawankule


Dainik Maval News : शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता माहे जुलैअखेर जिल्हानिहाय लोकअदालतीचे आयोजन करावे, त्याचबरोबर नागरिकांना शेतजमिनीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्याकरीता याबाबत इतर राज्याच्या प्रणालीचा अभ्यास करावा, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

novel ads

नवीन प्रशासकीय इमारत येथे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, उपसंचालक कमलाकर हटेकर, राजेंद्र गोळे, सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, राज्यातील समुद्र व खाडी किनारपट्टीवरील महसूली सीमा व उच्चतम भरती रेषेपर्यंतच्या जमिनीचे सर्वेक्षण व मोजणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभाग, महसूल प्रशासन, मेरीटाईम बोर्ड, वनविभाग, कांदळवन संरक्षण विभाग आदींच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करावी. मोजणी प्रक्रियेमध्ये सुटसुटीतपणा आणून नागरिकांना सुलभ सेवा देण्याकरीता प्रयत्न करावे. स्वामित्व योजनेअंतर्गत येणारी प्रकरणे बारकाईने हाताळून मार्गी लावावेत. योजनेअंतर्गत येणाऱ्या मालमत्तापत्रकांवर बँकेने कर्ज देण्याकरीता पुढे यावे. नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही करावी.

विभागाच्या आकृतीबंधाबाबत मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करावे. विभागातील रिक्तपदे भरण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. मंत्रालयीन स्तरावरील प्रकरणांचा पाठपुरावा करुन ते मार्गी लावण्याकरीता एका समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. राज्य शासनाच्या १५० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विभागनिहाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. राज्य शासन गतीमान पद्धतीने कामे करीत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजात गतिमानता आण्यासोबतच पारदर्शक पद्धतीने कामे करावीत, असेही बावनकुळे म्हणाले.

24K KAR SPA ads

डॉ. दिवसे म्हणाले, गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजनेअंतर्गत ३० हजार ४२२ गावे समाविष्ट असून त्यापैकी १८ हजार २८३ गावांचे मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहेत. माहे जून २०२५ ते माहे मे २०२६ पर्यंत प्रती महिना सुमारे १ हजार याप्रमाणे स्वामित्व योजना पूर्ण करण्याबाबत लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ३० भु-प्रणाम केंद्राचे लोकार्पण करण्यात आले असून येत्या काळात दुसऱ्या टप्प्यात ३५ भु-प्रणाम केंद्राचे लोकार्पण करण्याचा मानस आहे.

यावेळी डॉ. दिवसे यांनी माहिती तंत्रज्ञान कक्षाद्वारे करण्यात येणारे संगणकीकरण उपक्रम, नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार प्रकरणे, स्वामित्व योजना, नक्शा प्रकल्प, भू-प्रणाम केंद्र -प्रगती अहवाल, प्रलंबित अपील प्रकरणे, ईक्युजे कोर्ट २ प्रकल्प, रिक्तपदे, पी.जी.संकेतस्थळावरील प्रकरणे व निकाली काढण्याच्यादृष्टीने करण्यात येणारे प्रयत्न आदीबाबत माहिती दिली.

tata car ads

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंबी मावळ येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News
– नाणे मावळातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कौशल्या पवार यांची निवड । Maval News
– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News


dainik maval ads

Previous Post

लोणावळा शहरातील नागरी समस्यांबाबत शिवशाही व्यापारी संघाचे प्रशासनाला निवेदन । Lonavala News

Next Post

अधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने आणि समन्वयाने करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना । MP Shrirang Barne

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Review meeting of Karjat Khalapur constituency concluded in the presence of MP Shrirang Barne

अधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने आणि समन्वयाने करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना । MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Rice-Cultivated-Maval

दैनिक मावळ विशेष : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं । Rice Farming in Maval Taluka

July 30, 2025
Lonavla

लोणावळा – खंडाळा येथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्याचे न्यायालयाचे आदेश । Lonavala News

July 30, 2025
Maharashtra Revenue Department Jiwant Satbara Campaign 7/12 names of pass will be reduced

महसूल विभागाचा कारभार पारदर्शक होणार ; सात-बारा उताऱ्यावरील प्रलंबित नोंदी वेळेत मंजूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष

July 30, 2025
Cantonment Board Dehu Road

‘देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अनेक विकासकामे निधीअभावी मागील चार वर्षांपासून रखडली’

July 30, 2025
Chief Minister Devendra Fadnavis Cabinet Decision

गुडन्यूज ! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना करण्यास कॅबिनेटची मान्यता

July 30, 2025
Agriculture farmers damage to agricultural goods damaged farmers agricultural damage

अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता

July 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.