Dainik Maval News : मावळ तालुक्यात ठिकठिकाणी भात कापणीला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. भाताचे आगार असलेला मावळ तालुका इंद्रायणी तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. भाताची कापणी सुरु झाल्याने लवकरच बाजारात नवा इंद्रायणी तांदुळ उपलब्ध होणार आहे.
अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील भात पिकाची कापणी लांबणीवर पडली होती. मात्र परतीच्या पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतल्याने भात कापणीला वेग आला आहे. पवन मावळ विभागात इंद्रायणी भाताची कापणी सुरु झाली आहे. पवन मावळात भात कापणीसाठी मोठमोठी यंत्रे दाखल झाली आहेत.
सध्या भातशेतीत मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक शेतकरी यंत्राच्या साहाय्याने कापणी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या तावडीत पीक सापडू नये म्हणून उशीरा कापणी सुरू केली. सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी काढणीचा वेग वाढविला असल्याने शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंत्रांचा आधार घेतला आहे.
भात कापणीसाठी उपलब्ध असणाऱ्या या यंत्रांसाठी यंत्रमालकाला तीन ते चार हजार रुपये प्रति तास दराने भाडे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे. या मोठ्या यंत्राच्या साहाय्याने भात कापणी आणि मळणी एकाच वेळी होत असल्याने भात झोडपणीचा खर्च व वेळ वाचत आहे. परंतु या यंत्राने कापणी केल्यास पेंढा मिळत नाही, त्यामुळे चाटा टंचाई होऊ शकते.
भात कापणीचा हंगाम आणि मजुरांची भेडसावणारी टंचाई यामुळे शेतकरी यांत्रिकी पद्धतीने भात पीक काढण्यास प्राधान्य देत आहेत. सध्या मावळ तालुक्याच्या विविध भागांमध्ये असलेली मागणी विचारात घेता परराज्यातील अनेक हार्वेस्टर यंत्रे तालुक्यात दाखल झाली आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भात काढणीचे काम केले जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई – बाबा मतदान करा… मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून आई-बाबांना मतदानाचे आवाहन
– देवेंद्र फडणवीसांचा आदेश डावलला, बाळा भेगडे यांचा बापू भेगडेंना पाठींबा कायम, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही !
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha