अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बोराडेवाडी, मोशी प्राधिकरण परिसरात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला, सुगंधित तंबाखू आदींचा सुमारे 6 लाख 49 हजार 20 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून पदार्थ साठवणूक व वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या कारवाईत वाहन क्रमांक एमएच 14 एच.यु. 2042 या वाहनातून प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला, आरएमडी पानमसाला, व्ही 1 सुगंधित तंबाखु व एम सुगंधित तंबाखु इत्यादी पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीसाठी साठवण करणारे आरोपी किशोर हरकचंद सुंदेचा यांच्याविरूद्ध भोसरी औद्यागिक वसाहत पोलीस ठाणे, मोशी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Panmasala worth six lakhs was seized in raid by Food and Drug Administration Pune )
नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून 18 जुलै 2023 च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण, व विक्री यावर 1 वर्षाकरिता बंदी घातलेली आहे. प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– बिनविरोध सरपंच निवड झालेल्या आढले बुद्रुक गावच्या उपसरपंचपदी ‘यांची’ निवड
– कौतुकास्पद! मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी वसतिगृहाला अन्नधान्याची मदत
– दीपोत्सवाने फिटणार डोळ्यांचे पारणे! तळेगावात रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन