Dainik Maval News : गावाकडून शहरात वास्तव्यास आल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला आहे. सतत मोबाईलवर मुले आणि पालक व्यस्त असल्यामुळे एकमेकांमधील संवाद संपला आहे. नैराश्यामुळे 18 वर्षांखालील मुले-मुली आत्महत्या करण्याच्या किंवा पळून जाण्याच्या गंभीर घटना घडत आहेत. मुलांना स्मार्टफोन पासून दूर ठेवा, मुलांची मानसिक क्षमता ओळखा, त्यांचे मित्र बना, मुलांच्या भविष्याची काळजी करताना थोडे वर्तमानाकडेही लक्ष दिले तर मुले दुरावणार नाहीत, असा सल्ला खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शीतल राऊत यांनी पालकांना दिला आहे.
अल्पवयीन मुलांमध्ये स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे नैराश्यामुळे अठरा वर्षांखालील मुलेमुली आत्महत्या करण्याच्या किंवा पळून जाण्याच्या गंभीर घटना घडत आहेत. त्यामुळे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शीतल राऊत यांनी विद्यार्थी, पालकांमध्ये जनजागृतीसाठीची मोहीम हाती घेतली असून इयत्ता बारावी पर्यंतच्या मुलांना स्मार्ट फोन देऊ नका, मोबाईल द्यायचं असेल तर साधा मोबाइल द्या, अठरा वर्षाखालील मुलांना दुचाकी, चारचाकी वाहन चालविण्यास देवू नका, खोपोली शहरात वाहतूक पोलीस कारवाई करीत असून अल्पवयीन वाहन चालकांवर 5 हजार दंड आणि विना परवाना असल्यास 6 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळेच आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यासाठी देवू नका असेही अवाहन राऊत यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News