Dainik Maval News : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या पवना सहकारी बँक लिमिटेड या बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन करण्यात आले. शनिवारी (दि. ७ मार्च) रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी आमदार सुनील शेळके यांच्यासह माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विठ्ठल काळभोर, माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, शांताराम गराडे तसेच संचालक मडळ आणि इतर अन्य मान्यवर पाहुणे उपस्थित होते.
मावळ परिसरातील नागरिकांना अधिक उत्तम बँकिंग सेवा देण्याच्या उद्देशाने, बँकेच्या २४ व्या शाखेचा (टाकवे बुद्रुक) भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे संचालक मंडळ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख सेवा यांमुळे पवना बँकेने आजवर सभासदांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. या नवीन शाखेमुळे टाकवे बुद्रुक आणि आंदर मावळ व नाणे मावळ परिसरातील शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर
