व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News

दिनांक ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी पवनानगर परिसरातील वाहतूक मार्गात बदल

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 29, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Pavana-Lake-Camping

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवनानगर परिसरात ३१ डिसेंबर २०२४ आणि नववर्षाभिनंदनाकरीता येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीपासून ते ३१ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

पुणे-मुंबई-कामशेत बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चारचाकी वाहने बंद करुन ती येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे) कोथुर्णे-मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे, वारु फाट्यावरुन पुढे सरळ, ब्राम्हणोली फाटा मार्गे जवण रोडवरुन फांगणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग अशी वळविण्यात आली आहे. परंतु पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, पाले, घामणधरा, दुधीवरे बाजुस जाणारी वाहने व जड, अवजड वाहने यांना सोडण्यात येणार आहे.

येळसे ग्रामपंचायत फाटा येधून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजूकडे) कोथुर्णे गाव येथून डावीकडे- कोथुर्णे, मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.

ब्राम्हणोली, वारु, कोथुर्णे, शिवली येथील स्थनिक रहिवाशी यांना येळसे बाजूकडे येण्यास बंदी करण्यात येणार असून वारु फाटा-ब्राम्हणोली फाटा-पवना नदी पुल कालेगाव फाटा-पवना बाजारपेठ मार्गे येळसे कामशेत या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहेत.

पवनानगर बाजारपेठेत अवजड वाहनांना बंदी
३० डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ रोजी या कालावधीत पवनानगर बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जड-अवजड वाहतूक ही पवनानगर बाजारपेठ येथे जाण्यास बंदी करण्यात येत आहे. त्याऐवजी जुणे विश्रामगृह पवनानगर मार्गे केदारी खानावळ चौकातून सरळ पुढे सात नंबर कॉलनी-पत्राचाळ सचिवालय ग्रामपंचायत इमारत अशी बाह्य वळणमार्गे वळविण्यात येत आहे. पंरतु, ब्राम्हणोली, कालेगाव, दुधीवरे बाजूकडून येणारी जड-अवजड वाहतूक पवनानगर बाजारातून येळसे बाजूस सोडण्यात येइल.

दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री बारापासून ते मध्यरात्री बारापर्यंत या कालावधीत तुंग, मोरवे, चावसर, जवण, खडक गेव्हंडे, ठाकूरसाई, फांगणे बाजूकडून पवनानगर, कामशेत बाजूकडे जाणारी वाहने ही काले कॉलनी पवनानगर बाजूकडे जाणेस बंदी आहे. त्याऐवजी ब्राम्हणोली फाटा उजवीकडे-वारु फाटा सरळ मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे कोथुर्णेगाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजूकडे) येळसे ग्रामपंचायत फाटामार्गे मुंबई, पुणे, कामशेतकडे वळविण्यात येइल. पंरतु, पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, दुधीवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड-अवजड वाहने यांना सोडण्यात येईल.

दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते मध्यरात्रीपर्यंत या कालावधीत ब्राम्हणोली फाटा उजवीकडे वारु फाटा सरळ-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे कोथुर्णे गाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजूकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा अशी एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.

तसेच वारु व ब्राम्हणोली येथील स्थानिक रहिवाशी यांना पवना नदी पूल-कालेफाटा-पवना बाजारपेठ असे येण्यास बंदी करण्यात येत असून वारु फाटा-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे- कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल ; दुपारी बारानंतर प्रवास करावा…
– मावळात होणार हरिनामाचा गजर ! कामशेत येथे एक जानेवारीपासून भव्य ‘कीर्तन महोत्सव’ – पाहा वेळापत्रक
– महाराष्ट्रात शुक्रवार – शनिवार दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज ; सोमवारपासून थंडी वाढणार 


Previous Post

महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका कधी होणार? जाणून घ्या

Next Post

सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश – जाणून घ्या सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
four-wheeler

सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश - जाणून घ्या सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
MLA Sunil Shelke attention in session regarding issues in Dehuroad Cantonment area

रेडझोनचा प्रश्न, शिक्षण – आरोग्य – पाण्याची समस्या ; देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात लक्षवेधी

March 12, 2026
Agriculture Minister Dattatreya Bharane

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेणार – कृषी मंत्री

March 12, 2026
Katkari community gets benefit of Rs 2 lakh 39 thousand from government for building house with toilet

शौचालय सहीत घरकुल बांधणीसाठी कातकरी समाजाला सरकारकडून मिळतो २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ

March 12, 2026
Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.