Dainik Maval News : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत देशातील उच्च 500 कंपन्यांमध्ये एक कोटी युवक- युवतींना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तळेगाव दाभाडे शहरातील 21 ते 24 वयोगटातील युवक- युवतींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ( PM Internship Scheme )
यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून दहावी बारावी, आयटीआय, पदवीधर असणे आवश्यक आहे.’पीएम इंटर्नशिप योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात 4 हजार 145 जागा उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी 12 महिने असेल. ज्यामध्ये पाच हजार रुपये दरमहा मानधन, तसेच एकरकमी सहा हजार रुपये आणि विमा सुविधा दिली जाणार आहे.
- अधिक माहितीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील ‘एनयूएलएम’ कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले आहे.
अशी आहे नोंदणी प्रक्रिया –
लाभार्थींनी https://pminternship.mca.gov.in/login या संकेतस्थळावर जाऊन 31 मार्चपूर्वी आपली नोंदणी करावी. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीची आवश्यक माहिती व मार्गदर्शन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा
