Dainik Maval News : आंदर मावळातील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमात ‘काही तरी बोलू आयुष्यावर’ हा कविता वाचन कार्यक्रम संपन्न झाला. सुप्रसिद्ध कवी म.भा. चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
चाळीशी-पन्नाशीनंतर प्रत्येकाचं जीवन म्हणजे अनुभवांचं एक मोठं भांडार असतं. सुख-दुःख, यश-अपयश, अपमान-अवहेलना, अडचणीच्या प्रसंगी कुणी दिलेला मदतीचा हात असो की, ऐन मोक्यावर कुणी दिलेला धोका असो, या साऱ्या अनुभवातून तावून सुलाखून गेल्यानंतर जी समज येते, जी जाणीव होते, ती प्रत्येकाच्या पुढील आयुष्याला वळण देत असते. जीवनातील हे सारे उन्हाळे-पावसाळे कधी तरी कुणाला तरी सांगावेसे वाटतात. हेच व्यक्त करण्यासाठी ही काव्य मैफल आयोजित केली होती.
विविध अनुभवांची मांडणी करीत अनेक मान्यवरांनी आपल्या अनुभवातून कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेला. काव्य मैफलीबद्दल वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांनी समाधान व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, कवी परशुराम वाघचौरे, श्रीधर पाटील, दिलीप विधाटे, बालाजी थोरात, सुभाष चव्हाण, कवयित्री प्रीती सोनवणे, रूपाली भालेराव हे यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. राजेंद्र सोनवणे व विजय जगताप यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी ; आरपीआयचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन
– परभणी घटनेच्या निषेधार्थ पवनानगर बंद ! आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी । Pavananagar
– बनावट घड्याळ विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल, देहूरोड येथील घटना । Maval Crime