Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण हद्दीतील पान टपरींवर धडक कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पानटपरींवर गांजा, एम.डी. पावडर असे प्रतिबंधीत अंमली पदार्थ पानामध्ये मिसळून शाळा व कॉलेजमधील मुलांना सर्रासपणे विकले जात आहेत.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने लोणावळा शहरातील १) प्रेम बाळासाहेब जाधव (वय १९ रा.शिलाटणे ता.मावळ) पान स्टॉल नाव – चैतन्य पान शॉप, रायवूड मंदीर रोड २) नरेश नगाराम सुर्यवंशी (वय ४५ रा. लोणावळा ता.मावळ) पान स्टॉल नाव – नरेश पान शॉप, ३) विनायक शंकर दहिभाते (वय २८ रा. कामशेत ता.मावळ) पान स्टॉल नाव – साईरतन पान शॉप, ४) निखील हरिदास आझाणकर (वय २४ रा.पांगोळली ता.मावळ) पान स्टॉल नाव – महालक्ष्मी पान शॉप आणि ५) राहुल सुनिल शेलार (वय २१ रा. औंढे ता.मावळ) पान स्टॉल नाव – पैलवान पान शॉप याठिकाणी जाऊन सदर टपऱ्यांची तपासणी केली.
त्यावेळी या टपरींमध्ये मिळुन आलेल्या पावडर व इतर पानात मिक्स करणारे साहित्य ताब्यात घेण्यात आले. सदर पावडर व इतर साहित्य तपासणीकरीता अन्न प्रशासन पुणे यांच्याकडे पाठविण्यात येणार असून अन्न प्रशासनाचा रिपोर्ट आल्यानंतर संबंधित पानटपरी मालक व चालक यांच्या विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- लोणावळा शहर व ग्रामीण पान टपरी मालक व चालक यांनी पानटपरीवर १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणार नाही, पानटपरी वेळेत बंद करणे व पानटपरी मध्ये १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ दिले व विकत देणार नाहीत, याबाबतचा फ्लेक्स बोर्ड तयार करुन लावण्यात यावा, पानटपरी मध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे इत्यादी सुचना सत्यसाई कार्तिक यांनी दिल्या आहेत.
तसेच पोलीस स्टेशनकडून टपरी चालक व मालक यांना पानटपरी बाबत योग्य ती कायदेशीर लेखी नोटीस देण्यात येणार आहे. यासह लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना शाळा व महाविद्यालयाच्या शंभर मीटरच्या आवारातील तंबाखु व इतर तत्सम पदार्थ विकणाऱ्या पानटपरीवर तत्काळ कारवाई करणे बाबतीत लेखी पत्र देण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या उपस्थितीत, लोणावळा शहर पोलीस निरिक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस अंमलदार शेखर कुलकर्णी, हनुमंत शिंदे, आदित्य भोगाडे, अंकुश पवार,पवन कराड हे पानटपरी धडक कारवाईत सहभागी होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा