Dainik Maval News : राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे. यापार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरात शुक्रवारी (दि.१) पोलिसांनी सशस्त्र रुटमार्च काढला.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शुक्रवारी (दि. 1 ऑक्टोबर) पोलिसांनी सशस्त्र रुटमार्च कढला. शुक्रवारी सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान वडगाव शहरातून बाजारपेठ, जामा मस्जिद, ढोरे वाडा, मिलिंद नगर, कुढे वाडा या भागातून सशस्त्र रूट मार्च काढण्यात आला.
सदर सशस्त्र रूट मार्च मध्ये एकूण 2 अधिकारी, 18 अमलदार आणि सीआयएसएफ चे 25 जवान हजर होते. वडगाव मावळ शहर हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांचा कक्ष आहे. त्यामुळे वडगाव शहरात नेहमीच गर्दी पाहायला मिळते. सोबत आता दिवाळी देखील आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील महिला आणि तरुणांमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या व्हिजनची चर्चा । Bapu Bhegade
– मावळ हादरलं ! ऐन निवडणूकीच्या धामधुमीत भाजपा पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या । Maval Crime
– ‘चिंचवड’च्या राजकारणातून ‘मावळ’वर निशाणा ! सुनिल शेळकेंसाठी अजितदादा मैदानात ? ‘मावळ पॅटर्न’ला उत्तर देणारा ‘चिंचवड पॅटर्न’