Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता पिंपरी – चिंचवड पोलीस दलात देखील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यात मावळमधील तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजित विष्णू जाधव यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी संतोष बळीराम पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे.
तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजित विष्णू जाधव यांची वाहतूक शाखेत बदली झाली आहे. तर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले संतोष बळीराम पाटील यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवे पोलीस निरिक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. दरम्यान मुदतीपूर्वीच रणजित जाधव यांची बदली झाल्याने, चर्चांना उधाण आले आहे.
२०१५ मध्ये तळेगाव दाभाडे परिसरातील बारा गावांसाठी तळेगाव एमआयडीसी या नवीन पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. नवलाख उंबरे, इंदोरी, माळवाडी, सुदुंबरे, आंबी, मंगरूळ, वराळे, नाणोली, कातवी, सुदवडी, कोटेश्वरवाडी, जांभवडे आणि तळेगाव एमआयडीसी परिसरांचा हद्दीत समावेश होतो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा