Dainik Maval News : मावळ (maval taluka) तालुक्यात एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा (lonavala police) ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन चिमुकलीसोबत लैंगिक चाळे केल्याची गंभीर घटना घडली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी (police) हा त्यावेळी नशेमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांत प्राप्त फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा व परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असल्याने बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस पथक मागविण्यात आले होते. त्यापैकी एक पोलीस कर्मचारी सचिन सस्ते हा बंदोबस्त कामी असता त्याने दारूच्या नशेत एका पाच वर्षीय आदिवासी मुलीसोबत गैरकृत्य केले. तिच्यासोबत लैंगिक चाळे केले. मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली व फिर्याद दाखल केली, त्यानुसार आरोपी सचिन सस्ते या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ह्या घटनेची माहिती समजताच अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी प्राप्त फिर्यादीच्या आधारे आरोपीवर पोक्सो, अट्रॉसिटी तसेच भारतीय न्याय संहिता 64a (2), 65(2), 74 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अटक असून प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे वरीष्ठ अधिकारी करीत आहेत. दरम्यान खाकी वर्दीतील कर्मचाऱ्याने असे कृत्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार