Dainik Maval News : खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळा शहराजवळील शिवलिंग पॉइंट येथे झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. ही माहिती समोर येताच एकच खळबळ माजली आहे.
ह्या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून शिवदुर्ग मित्र रेस्कू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.
- दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवलिंग पॉइंटजवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी जावून पाहिले असता आत्महत्या केलेल्या ठिकाणाजवळ एक क्रेटा गाडी (क्रमांक MH 17 CM 9697) उभी होती. गाडीची माहिती घेतली असता गाडी मालकाचे नाव अण्णा बादशहा गुंजाळ (रा. खंडगाव, संगमनेर, अहिल्यानगर) असल्याचे समजले. पोलिसांनी गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क केल्यानंतर ही गाडी अण्णा गुंजाळ यांची असून ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्याशी संपर्क केल्यावर गुंजाळ हे तिथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून तीन दिवसांपासून गैरहजर होते. त्यांचा फोन लागत नव्हता आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली जाणार होती, असे पोलिसांना समजले. ( Police sub-inspector Anna Gunjal of Khadki police station committed suicide near Lonavala city )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर