Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्भयपणे आणि निःपक्षपातीपणे व्हावी, यासाठीचे वातावरण शहरात राहावे, याकरीत प्रशासन काटेकोरपणे आचारसंहितेची अंमलबजावणी करीत आहे. अशात पोलीस प्रशासन देखील सज्ज असून शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात विनानंबरप्लेट आणि काचांना काळ्या फिल्म लावून फिरणाऱ्या 44 वाहनांवर बुधवारी (दि. 26) कारवाई करीत 38 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
लोणावळा शहर आणि परिसरात सध्या अनेक वाहने नंबर प्लेट काढून फिरताना दिसून येत आहे. तसेच काळ्या काचांच्या वाहनांमधून शहराबाहेरील तरुणांची टोळकी शहरामध्ये धुमाकूळ घालत असल्याबाबतची माहिती समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकीकडे निवडणुका तणावमुक्त वातावरणामध्ये पार पडाव्यात, असे निवडणूक आयोग सांगत असताना दुसरीकडे लोणावळा शहरामध्ये मात्र खुलेआम विनानंबर प्लेट व काळ्या काचा असलेली वाहने फिरत आहेत. पोलिसांनी सुरू केलेली ही कारवाई मतदानाच्या दिवसापर्यंत कायम ठेवावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…
