Dainik Maval News : मावळ तालुक्यातील नायगाव मधील येवलेवाडी येथील आदर्श शेतकरी पोपट गणपत येवले यांचे बुधवारी (दि. १०) रोजी अल्प आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी रोजी त्यांच्यावर नायगाव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कान्हे येथील पत्रकार सोपान येवले यांचे ते वडील, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा येवले यांचे ते बंधू होत. पोपट येवले यांच्या आकस्मित निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोपट येवले हे कष्टाळू, प्रामाणिक व साधेपणासाठी ओळखले जात होते. शेती व्यवसायाबरोबरच गावातील सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. नातेसंबंध जपणारे, मदतीस तत्पर व कुटुंबवत्सल अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, भाऊ, नातू, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी नायगाव (येवलेवाडी) येथील त्यांच्या राहत्या घरी पार पडणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित