सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकांचा निकाल काय लागणार, कोण गुलाल उधळणार याची चर्चा होत आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर होतील. परंतू मावळ तालुक्यात 4 जून पूर्वीच गुलाल उधळला आहे. या गुलाल उधळण्याचे कारण आहे पाटण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पाटण गावचे मावळते सरपंच प्रवीण तिकोने यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकाल पूर्ण केल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडप्रक्रिया राबवण्यात आली. दिनांत 27 मे रोजी सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी विहित कालावधीत प्रमिला कोंडभर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ( Pramila Kondbhar Elected as Sarpanch of Patan Gram Panchayat Maval Talauka )
त्यामुळे निवडणूक अधिकारी तथा मंडल अधिकारी धायगुडे साहेब यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून सरपंच पदी प्रमिला कोंडभर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामसेवक राजेंद्र खरात, तलाठी सुप्रिया कावरे, माजी सरपंच प्रवीण तिकोने, माजी उपसरपंच दत्तात्रय केदारी, मा उपसरपंच सोनल सनस, मा उपसरपंच सुनिता तिकोने, मा उपसरपंच शालन शिलवणे, ग्रामपंचायत सदस्य दशरथ कदम, मालता केदारी, मा उपसरपंच संदीप तिकोने, मा उपसरपंच बेबीताई तिकोने, सुरेखा तिकोने, शंकर तिकोने, मा तंटामुक्ती अध्यक्ष पंकज तिकोने, अरुण तिकोणे, श्रीकांत शिलवणे, अक्षय तिकोने, श्रीकांत तिकोने, लिपिक गणेश केदारी, विकास वाघमारे, भरत साठे आदी उपस्थित होते.
प्रमिला कोंडभर यांच्या सरपंचपदी निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी आणि सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच भंडारा आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. सर्वांच्या वतीने नवीन सरपंच प्रमिला कोंडभर यांचा सन्मान सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पंजाब राज्यातील तरूणाचा बुडून मृत्यू; गुगलवर मॅप पाहून पर्यटनासाठी आले आणि…
– दहावीचा निकाल जाहीर ! पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेचा 100 टक्के निकाल, सिद्धी सुतारचा पहिला नंबर । Pavananagar News
– तळेगावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेचा 100 टक्के निकाल; 19 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण । SSC Result 2024