लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार असून ही प्रक्रिया शांततेत व निःपक्षपाती वातावरणात पार पाडली जावी व कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २१ अन्वये या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना संहिता कलम १२९. १३३, १४३ व १४४ खाली अधिकार बहाल करण्यात आले आहेत. ( Praveen Dhamale Appointed as Special Executive Magistrate at counting center for Maval Lok Sabha Constituency )
मावळ लोकसभा मतदार संघाची मजमोजणी बालेवाडी स्टेडीयम येथे होणार असून त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार प्रवीण ढमाले (९८५०५०४५८८) यांची नेमणूक विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एफसीआय गोडावून कोरेगाव पार्क, पुणे येथे होणार असून त्याठिकाणी पुणे येथील निवासी नायब तहसीलदार शंकर ठुबे (९८२२६५२७३७) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणाऱ्या महाराष्ट्र औद्यागिक वखार महामंडळाचे गोडावून नं. २, ब्लॉक पी-३९, एमआयडीसी एरिया रांजणगाव, कारेगांव, ता. शिरुर येथे शिरूर तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी (९४२००१३९४६) यांची नियुक्ती विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून करण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी तथा नोडल अधिकारी कायदा सुव्यवस्था ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! तळेगावकरांची होणार गैरसोय, गुरुवारी ‘या’ ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या । Talegaon Dabhade
– अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval News
– मळवंडी ठुले येथे खरीप हंगाम शेतकरी सभा संपन्न; शेतकऱ्यांना गादीवाफा रोपवाटिका, चारसूत्री भातलागवड, बिजप्रक्रियेबाबत मार्गदर्शन