Dainik Maval News : कार्ला येथील एकविरादेवी मंंदिरात गुरुवारपासून (दि. 3 ऑक्टोबर) नवरात्र उत्सवाची सुरूवात होत आहे. दरवर्षी लाखो भाविक नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर एकविरा देवी देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून उत्सवाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सव काळात भाविकांना सहज व सुलभपणे दर्शन घडावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दी नियंत्रणासाठी दर्शन रांगा वाढविण्यात आल्या आहेत. तसेच गडावर भाविकांना पिण्यासाठी पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता इच्छूक उमेदवार, नेते मंडळी यांच्या गाठीभेटी अधिक राहण्याचा अंदाज घेवून अधिकचा बंदोबस्त येथे तैणात केला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले.
अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन –
एकविरादेवी मंदिर परिसरातील विविध विकासकामांसाठी आमदार सुनिल शेळके यांंच्या पाठपुराव्यातून तीर्थक्षेत्र विकास आराखडा माध्यमातून 39 कोटी 43 लक्ष रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. त्यातून उपलब्ध निधीतून होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 4) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8 हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान, राज्य सरकारचा निर्णय
– सरकारच्या २ एकर जमीन वाटपाला पवना धरणग्रस्तांचा तीव्र विरोध, प्रत्येकी ४ एकरवर शेतकरी ठाम !
– कामशेत येथील आश्रम शाळेतील 300 विद्यार्थिनींना ‘गुड टच – बॅड टच’चे धडे । Kamshet News