व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“बिबट्या वैरी नाही तर शेजारी…”

"बिबट्या वैरी नाही तर शेजारी" असा संदेश देणारा प्रबोधनपर कार्यक्रम लोणावळा जवळील खोपोली शहरात आयोजित करण्यात आला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 31, 2023
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Leopards

Photo Courtesy : File Photo / Leopards


“बिबट्या वैरी नाही तर शेजारी” असा संदेश देणारा प्रबोधनपर कार्यक्रम लोणावळा जवळील खोपोली शहरात आयोजित करण्यात आला होता. खोपोलीतील विहारी – ठाकूरवाडी इथे खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी (ता. रायगड) राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट – पुणे” यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला. ( program to raise public awareness about leopards was organized in khopoli city raigad )

काही दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी झालेले बिबट्याचे दर्शन आणि त्यामुळे जनमाणसात निर्माण झालेली दहशत दूर करण्यासाठी विहारी-ठाकूरवाडी येथील ग्रामस्थांसोबत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट – पुणेचे नरेश चांडक आणि सायली पिलाने यांनी संवाद साधत चर्चा केली. अत्यंत सोप्या भाषेत दृकश्राव्य माध्यमातून बिबट्याच्या बाबतीत सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.

बिबट्या हा वन्य आणि भटक्या प्राण्यांचीच शिकार करतो त्यामुळे मानव हा त्याची भक्ष्य नसून तो मानवाला घाबरतो, हे उदाहरणांसह पटवून दिले गेले. आपापली पाळीव जनावरे गोठ्यात बांधून ठेवावीत, परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून कुत्री आणि डुक्कर यांच्यासारखे भटके प्राणी आपल्या परिसरात वावरणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन केले गेले. बिबट्याची माहिती मिळताच घाबरून न जाता 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा अथवा वनखात्याशी संवाद साधावा अशी सूचना यावेळी देण्यात आली. त्याचसोबत उपस्थितांच्या शंकांचे निवारण देखील केले गेले.

awareness-program-khopoli-raigad
Photo Courtesy : Gurunath Sathilkar

“बिबट्या वैरी नाही शेजारी” या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिबट्यांच्या बाबतीत जनजागृती करण्याचा हेतू पर्यावरण पूरक असल्याचे प्रतिपादन नारायण निरगुडा आणि विहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी केले. वनपाल भगवान दळवी, वनरक्षक नितीन कराडे, चंदन नागरगोजे, शीतल साळुंखे, संतोषी बस्तेवाड, राजेश्री मुसनर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, अमोल ठकेकर, प्रसाद अटक यांच्यासह अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवून वार्तालाप केला. या कार्यक्रमात ज्येष्ठ ग्रामस्थांसह महिला, युवक तसेच बालगोपाळांनी सहभाग घेतला होता. ( program to raise public awareness about leopards was organized in khopoli city raigad )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष – कर्णवेध संस्कार । कान का टोचले जातात? भिकबाळी का वापरावी? कर्णभुषणे महत्व व परंपरा, वाचा…
– लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, वाचा काय आहेत निर्बंध
– चांगला निर्णय! आदिवासींच्या खेळांना क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळणार
– जुना मुंबई पुणे हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल


Previous Post

मावळ तालुक्यातील 47 गावांतील पोलिस पाटील पदांचे आरक्षण जाहीर; पाहा आरक्षणासह गावांच्या नावांची संपूर्ण यादी

Next Post

ई-पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन, वाचा अधिक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
E-Peek-Pahani

ई-पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन, वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
girl-dies-after-drowning

इंदुरी येथे इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून तरूणीची आत्म’हत्या

February 27, 2026
Strict measures to prevent accidents on highways Strict action against drunk drivers said Transport Minister

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना ; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई – परिवहन मंत्री

February 27, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

February 27, 2026
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
Pravin Bhawar appointed as chairman of Mangal Parinay Sohla 2026 by Janhit Charitable Trust

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ च्या नियोजन समिती अध्यक्षपदी प्रविण भवार

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.