पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार, परमिट रूम तसेच हुक्का पार्लर यांच्या नियमनासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खाली दिनांक 07/03/2024 रोजी पासून प्रतिबंध आदेश निर्गमित केले आहेl. त्याअंतर्गत,
1. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व परमिट रूम, बार तसेच सर्व आस्थापना रात्री 12.30 वाजता पूर्णपणे बंद होतील.
2. रात्री 12.00 वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ अथवा मद्य इत्यादीसाठींची ऑर्डर घेतली जाणार नाही.
3. तसेच ज्या परमिट रूम मध्ये दारू दिली जाते त्या ठिकाणी 18 वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या प्रचलित नियमानुसार वयाचे निकष पाळले जातील, विशेषतः 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला दारू दिली जाणार नाही.
4. सर्व आस्थापनांनी ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण नियम सन 2000 चे काटेकोरपणे पालन करावे.
5. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व आस्थापनांमधील जे संगीत कार्यक्रम बंद इमारतींमध्ये होतात ते बरोबर रात्री साडेबारा वाजता बंद होतील तसेच सर्व खुले संगीत कार्यक्रमांची वेळ ही रात्री दहा वाजेपर्यंत असेल. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
6. ग्राहकांना बसण्याचे ठिकाणी असलेल्या जागी कुठल्याही प्रकारचे नृत्य करण्याची परवानगी असणार नाही. कारण यामुळे शेजारच्या ग्राहकांना विनाकारण त्रास होऊ शकतो तसेच यातून वाद देखील होऊ शकतात.
7. व्यवसाय कलाकार अथवा डीजे, गायक इत्यादी यांना कार्यक्रमाला बोलवायचे असल्यास त्याबाबत विहित आदेशांचे पालन करावे लागेल.
8. अशा सर्व आस्थापनांमध्ये तसेच आस्थापनांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये प्रवेश बाहेर पडण्याचा मार्ग, ग्राहक बसण्याची जागा, बार काउंटर इत्यादी जागांचे चित्रीकरण होईल तसेच सर्वसामान्यपणे ज्या ठिकाणी ग्राहकांचा वावर असतो, अशी कुठलीही जागा सीसीटीव्ही शिवाय राहणार नाही.
9. तसेच सदर सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग करण्यासाठी दोन डिव्हीआर लावण्यात यावेत.
10. अशा सर्व आस्थापनांनी सुरक्षिततेच्या अनुषंगाने योग्य ते स्त्री व पुरुष सुरक्षा कर्मचारी नेमावेत जे आस्थापना चालू असण्याचे वेळेमध्ये पूर्णवेळ उपस्थित असतील. तसेच अशा सुरक्षा कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे अतिशय आवश्यक आहे.
11. अशा आस्थापनांमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व महिला व लहान मुले तसेच पुरुष यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही या आस्थापनेच्या व्यवस्थापकावर/ मालकावर (ज्याचे नावावर परवाना आहे ) त्याची असेल.
12. अशा आस्थापनांच्या लगतच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालेल तसेच ग्राहकांची वाहणे पार्किंग मध्ये लागतील याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापक मालकांची असेल.
13. अशा आस्थापनांमध्ये जे ग्राहक दारू पितील ते परत जाताना आस्थापनाच्या परिसरांमधून गाडी चालवत जाणार नाहीत याची खात्री करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापक /मालक यांच्यावर असेल.याबाबतची खात्री करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमावेत तसेच आस्थापनाच्या परिसरामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे हे बेकायदेशीर असल्याबाबत सूचना फलक लावने बंधनकारक आहे.
14. आस्थापनामध्ये गोंधळ किंवा नियंत्रित वर्तन निर्माण करणाऱ्या ग्राहकांना वेळीच समज देणे तसेच त्यांना दारू न देणे व त्यांना वेळीच आस्थापनाच्या बाहेर काढणेची जबाबदारी व्यवस्थापक/ मालक यांची असेल.अशा घटनांची चित्रीकरण करण्यात यावे.
15. वारंवार गोंधळ किंवा अनियंत्रित वर्तन करणाऱ्या ग्राहकांची वेगळी यादी बनवून त्यांना आस्थापना मध्ये प्रवेश नाकारण्यात यावा तसेच अशा व्यक्तींच्या यादींसाठी वेगळी नोंदवही तयार करण्यात यावी.
16. अशा आस्थापना ज्यामध्ये धूम्रपानं परवानगी आहे अशा ठिकाणी नियुक्त विशिष्ट क्षेत्र ज्याला धूम्रपान क्षेत्र( बंद किंवा खुले ) अशा ठिकाणीच धूम्रपान करणेची परवानगी असेल. सदर बाबत कोटपा ॲक्ट, 2003 चे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
17. हुक्का / शिशा हा कुठलाही आस्थापनामध्ये/सार्वजनिक जागेमध्ये /खाद्यगृहांमध्ये ग्राहकांना सेवनासाठी दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
18. सर्व आस्थापना No Drugs Allowed/ Drugs consumption is banned अशा सूचनांचे फलक लावतील तसेच पोलीस विभागाकडून स्थापनाच्या परिसरामध्ये तपासणी करून अशा प्रकारचे ड्रग्स ग्राहकांना दिले जात नाही याबाबत खात्री करण्यात येईल.
19. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तयार करण्यात आलेले सर्व नियम व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
या व अशाप्रकारच्या विविध सूचनांचे पालन करण्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार, परमिट रूम तसेच हुक्का पार्लर यांनी वर नमूद नियमांचे व निर्बंधांचे पालन न केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड विधान कायद्याचे कलम 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात येणार असेलबाबत या आदेशात नमूद केले आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्व आस्थापना चालकांना सदरच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आवाहन केले आहे. ( Prohibitory orders issued under Section 144 in hotels restaurants beer bars etc in rural areas of Pune )
अधिक वाचा –
– धमकीचं राजकारण! शरद पवारांची टीका आणि आमदार सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर, वाचा सविस्तर । Maval MLA Sunil Shelke & Sharad Pawar
– पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ! पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा । Pune Metro
– वडगाव शहरासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2 कोटी 45 लाखांचा निधी, ‘ही’ कामे लागणार मार्गी । Vadgaon Maval