Dainik Maval News : अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात १३ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
परिमंडळ अधिकारी ‘अ’ विभागांतर्गत डांगे चौक गणेशनगर काळाखडक, रहाटणी रामनगर, पिंपळे निलख गावठाण, मामुर्डी शितोळेनगर, परिमंडळ अधिकारी ‘ग’ विभागांतर्गत लोहियानगर, परिमंडळ अधिकारी ‘ज’ विभागांतर्गत वैभव नगर, तपोवन मंदिर रोड पिंपरीगाव, विणी चर्च जवळ गणेशनगर दापोडी, जय शंकर मार्केट चिंचवड स्टेशन, परिमंडळ अधिकारी ‘म’ विभागांतर्गत रहाटवडे, कुडजे, खेड, शिवापूर, श्रीरामनगर अशा एकूण १३ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जाहिरनामा काढलेल्या ठिकाणांसाठी करावयाचे अर्ज संबंधित परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध होतील. पात्रतेच्या अटी व शर्ती आदि माहितीसाठी संबंधित परिमंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा.
तरी इच्छुक व पात्र संस्थांनी ३१ जुलैपर्यंत संबंधित परिमंडळ अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे