मुळशीतून पुणे ( Pune ) शहरात प्रवेश करण्यासाठी वापरला जाणारा पुल पाडण्यात येणार ( Bridge Demolition ) आहे. मुंबई-बेंगलोर महामार्गावर या पुलाच्या येथूनच सातारा दिशेने जाण्यासाठी, पुणे शहरात जाण्यासाठी, बावधन-पाषाणकडे जाण्यासाठी रस्ते फुटतात. याच चांदणी चौकात ( Chandni Chowk ) अनेक वर्षांपासून हा पुल आहे. दररोज या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर उपाय म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असून त्यानुसार चांदणी चौकातील हा जुना पुल पाडण्यात येणार आहे. ( Pune Chandni Chowk Bridge Demolition )
चालू आठवड्यात पुल पाडण्याचे काम होणार आहे, त्यामुळे चांदणी चौकातील हा पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलावरची वाहतूक करण्यात आली असून मुळशी रोडवरून येणारा नवीन रॅम्प वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
‘चांदणी चौकात येणारी जड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. शृंगेरी मठ, वेदभवन समोरील काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, या चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 100 पेक्षा जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. मुळशी-सातारा दरम्यानचा रस्ताही सुरू करण्यात आला आहे. शृंगेरी मठ येथील 270 चौरस मीटर जागा ताब्यात घेऊन काम सुरू करण्यात आले आहे. अशाप्रकारे चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याच्या आधीची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. एनएचएआयने नियोजन केले असून या आठवड्यात पूल पाडण्याची शक्यता आहे’, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नोएडात ट्विन टॉवर जमीनदोस्त करणारी कंपनी दहा सेकंदात पाडणार पुल….
पुण्यातील चांदणी चौकातील जुणा पुल पाडण्यात येणार, या कामाची सध्या जोरात चर्चा होत आहे. महत्वाचे म्हणजे ज्या कंपनीने दिल्लीतील नोएडा येथील ट्विन टॉवर अवघ्या 12 सेकंदात पाडला तेच तंत्रज्ञान वापरुन तीच कंपनी हा पुल काही सेकंदात जमीनदोस्त करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ( Pune Chandni Chowk Bridge Demolition Work Start From Today )
अधिक वाचा –
Video : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, एक-दोन-तीन-चार…सलग नऊ गाड्या एकमेकांवर आदळल्या
व्हिडिओ: गणेश विसर्जनाच्या दिवशी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुण्यात कौतुकास्पद उपक्रम