Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता केलेल्या तयारीचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेतला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त अँलिस पोरे, नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, आदी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायती यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जारी केलेला आहे. सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी.
आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करून सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी प्रभाविपणे पार पडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. निवडणूका शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावे.
केलेले नियोजन व कार्यवाहीबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. संबंधित विषयांच्या नोडल अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबतचा विस्तृत आढावा उद्या दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल, असेही श्री. डुडी म्हणाले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– टाकवे-नाणे गटातील प्रमुख दावेदार डॉ. अशोक दाते यांचा जनसंपर्क दौरा ; भक्तिभावाच्या वातावरणात नागरिकांचे उत्स्फूर्त स्वागत
– मावळ तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी ; मेघाताई भागवत यांना आंबी गावात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Megha Bhagwat
– काले-कुसगांव गटातील भाजपाचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर दळवी यांनी घेतली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट
