चैत्र शुद्ध सप्तमीला कार्ला येथील श्री आई एकविरा देवीचा पालखी सोहळा आणि यात्रा असते. यंदा दिनांक 28 मार्च रोजी ही यात्रा होत असून या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मद्य विक्री बंदीचे आदेश जारी केले आहेत.
श्री एकविरा देवीच्या यात्रे निमित्त आणि पालखी सोहळ्याच्या निमित्ताने, मौजे वेहेरगाव, कार्ला, मळवली, वरसोली, वाकसई (ता. मावळ, जि. पुणे) या गावातील सर्व प्रकारच्या मद्य विक्री अनुज्ञप्ती तीन दिवस बंद करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेत. ( Pune District Collector Rajesh Deshmukh Orders To Ban On Sale Of Liquor In Vehergaon Karla Malvali Varsoli Vaksai Villages In View Of Ekvira Devi Yatra )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री एकविरा देवीच्या यात्रे निमित्त राज्यातुन सुमारे 5 ते 6 लाख भाविक यात्रेसाठी येत असतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मागील वर्षीच्या धर्तीवर श्री एकविरा यात्रेनिमित्त महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, 1949 मधील नियम 142 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिनांक 27 मार्च, 2023, 28 मार्च 2023, 29 मार्च, 2023 हे तीन दिवस मौजे वेहेरगाव, कार्ला, मळवली, वरसोली, वाकसई ता. मावळ, जि. पुणे या गावातील सर्व प्रकारच्या मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद करण्याचे आदेश पारीत केले आहेत.
उपरोक्त नमुद केलेल्या दिवशी सर्व प्रकारच्या मद्य अनुज्ञप्ती बंद ठेवायच्या असून त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, 1949 व त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी, असे आदेश पत्रात म्हटले आहे.
अधिक वाचा –
– पवना धरणातील जलसाठा निम्म्यावर; पिंपरी-चिंचवड शहरवासियांसह पवन मावळातील शेतकरी आणि सामान्य नागरिक चिंतेत
– शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई, बेकायदा मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला, टेम्पोत तब्बल 5 टन मांस