Dainik Maval News : पुणे – लोणावळा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकचे काम काही केल्या मार्गी लागताना दिसत नाही. केवळ निर्णय होऊन आणि बातम्यांमध्ये अडकून पडलेले हे काम प्रत्यक्ष होताना दिसत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे काम लालफितीत अडकले आहे. लोहमार्गावरील तिसरा व चौथा ट्रॅक मंजुर होऊनही अद्याप कागदावरच आहे. प्रत्यक्ष कामासाठी कोणतीही हालचाल होत नाही.
रेल्वे ट्रॅकला मंजुरी दिल्यानंतर ह्या कामाला केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात कोण किती खर्च करणार हे ठरलेले नाही, तर दुसरीकडे काम कधी सुरु होणार याचीही माहिती नाही. एकंदरीत निर्णय झाला तरीही काम प्रत्यक्ष लालफितीत अडकलेले दिसते.
पुणे – लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या लाइनचा प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. 24 वर्षांपूर्वी 1997-98 मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गाला पहिल्यांदा मंजुरी मिळाली होती. यानंतर 2014-15 मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला.
दरम्यान रेल्वे बोर्डाने 2016 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या लाइनसाठी 943.60 कोटींच्या खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला. 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांनी या मार्गासाठी राज्य सरकारकडून बजेट मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर राज्य शासनाकडूनही याकडे दुर्लक्ष झाले.
राज्य आणि केंद्र शासनाकडून मेट्रो प्रकल्पांसाठी मोठी तरतूद केली जाते. दुसरीकडे मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. केवळ निर्णयावर समाधान किती दिवस मानायचे, असा सवाल सामान्य रेल्वे प्रवासी करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठा निर्णय : राज्यात सर्व चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य
– महाराष्ट्र शासनाच्या कामकाजातील निर्णय प्रक्रीया सुलभ व गतीमान होणार ; प्रशासकीय कारभार बनणार अधिक पारदर्शक
– नवं सरकार, नवं धोरण : ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम