Dainik Maval News : मावळवासियांची गुरुवारची ( दि. 30 ) सकाळ ही रिमझिम पावसाने झाली. गुरुवारी पहाटेपासूनच मावळ तालुक्यातील काही भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. तसेच सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची झालर सर्वत्र पसरली होती.
मावळ तालुक्यातील या बदललेल्या वातावरणामुळे तालुक्यातील भात उत्पादक आणि अन्य पिके घेणारे शेतकरी हे सध्या चिंतेच्या गर्तेत अडकले आहेत. मावळात भात पिके ही सध्या काढणीस आलेली आहेत, अशात पावसाच्या सरी कोसळत असल्याने आणि ढगाळ वातावरण राहत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे.
पर्यटननगरी लोणावळा परिसरात देखील दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. बुधवारी लोणावळा परिसरात ३ मी.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. तर संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहिले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर
