मावळ तालुक्यातील तळेगाव ( Talegaon ) इथे नियोजित असलेला वेदांता ( Vedanta ) आणि फॉक्सकॉन ( Foxconn )
या कंपनीचा प्रकल्प गुजरात ( Gujarat ) राज्यात गेल्यामुळे राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ( Project Which Was Going To Be Done In Maval Taluka Went To Gujarat )
फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमी कंडक्टरचा हो मोठा प्रकल्प राज्यातील भाजपा-शिंदे गटामुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला जात आहे. यातच राज ठाकरे यांनी देखील एक विशेष ट्विट केले आहे. ( Raj Thackeray Reaction On Vedanta Foxconn Project Shift To Gujarat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणालेत राज ठाकरे?
“फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?
— Raj Thackeray (@RajThackeray) September 13, 2022
तसेच पुढे, “हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं.” असे राज ठाकरे म्हणालेत.
अधिक वाचा –
धक्कादायक! पौडमधल्या प्रसिद्ध बेकरीच्या खाद्य पदार्थात आढळला टिशू पेपर, तक्रार दाखल
लम्पी स्कीन : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यासाठी तातडीने 10 हजार लशी उपलब्ध